सामान्य ज्ञान स्पध्रेत अविनाश पाटील प्रथम (Punyanagri-Nagpur)page-No.18
| ||
विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार वितरण करताना मान्यवर. नागपूर बुटीबोरी : जीवन विद्या अकादमी बुटीबोरी तर्फे २९ ऑगस्टला सरस्वती किसान विद्यालयात येथे घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा-२0१६ स्पर्धेत अविनाश पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पध्रेत द्वितीय क्रमांक शंकर मंडल यांनी तर तृतीय क्रमांक कुणाल कांबळे यांनी पटकावला. स्पर्धेत सर्वांत कमी वयोगटातील इयत्ता चवथीच्या जान्हवी महाजन हिला विशेष पुरस्कार देण्यात आला. यात पुष्कळ विद्यार्थी सहभागी झाले होते. परीक्षेतील गुणानुक्रमे विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व टॅब बुक, मोबाइल पुरस्काराच्या स्वरूपात देण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालन जीवन दुधे, चंद्रमणी लोटे, प्रेरणा कॉन्व्हेंटचे संस्थापक गणेश सोनटक्के, विशाल दुधे, पायल दुधे व विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संचालन विशाल दुधे यांनी केले. तर, आभार अमोल दुधे यांनी मानले. व अधिक माहिती www.jeevanvidya.co.in व् Jeevanvidya. blogspot.com या website वर उपलब्ध करुण देण्यात आली आहे |